घरगुती जेवणाची
उत्तम चव.

|| श्री स्वामी समर्थ ||

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे |
सहज हवन होते नाम घेता फुकाचे |
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह |
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ||

About Us

आमच्याबद्दल आणखी जाणून घ्या

कोणत्याही देवस्थानाचे जेवण , मग ते प्रसादालय असो वा खानावळ , अगदी मोजकेच पदार्थ घरगुती आणि संपूर्ण सात्विक जेवण, अतिउत्तम चव , यथेच्छ आणि गरमागरम जेवण असले की तृप्तीची ढेकर आल्याशिवाय राहत नाही.

  • श्री स्वामी समर्थांची पावन नगरी अक्कलकोट येथे शुद्ध सात्विक आणि घरगुती जेवण मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे जोशी भोजनालय.
  • श्रीमती कुसुम गुंडाचार्य जोशी यांनी 1985 ला आपल्या घरातूनच याची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात चार रुपयात पोटभर जेवण मिळत असे. नंतर मिळत जाणाऱ्या लोकांच्या प्रतिसादामुळे जोशी भोजनालयाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. .
  • भात, आमटी, पोळी, भाजी असे मोजके पदार्थ असताना त्यात काळानुरूप बदल होऊन चटणी, लोणचं, कोशिंबीर ताक, पापड यांचा समावेश होऊन साग्रसंगीत जेवणाची थाळी उदयास आली. थाळी करता लागणारे सगळे जिन्नस घरच्या घरीच तयार केले जात असल्यामुळे आलेल्या ग्राहकाला घरच्या जेवणाचे समाधान मिळते. आजही आमच्याकडे एकदा जेऊन गेलेला ग्राहक अक्कलकोट ला आला की नेहमी जोशी भोजनालयातच येतो.

यथेच्छ भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य भेट द्या

आमची वैशिष्ट्ये

साधं, मनाला समाधान देणार घरगुती जेवण हे आमचे वैशिष्ट्य. जेवणाकरता लागणारे मसाले आम्ही घरीच बनवतो.त्यामुळे आमची चव आजही टिकून आहे. जेवणाच्या थाळीमध्ये भात, दोन भाज्या, चपाती, आमटी, चटणी, लोणचे, कोशिंबीर, पापड आणि ताक हे पदार्थ असतात.

शुद्ध आणि सात्त्विक सामग्री

कृत्रिम पदार्थ किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्जपासून मुक्त, कमी तिखट-कमी तेलकट आणि पचायला हलकं जेवण

स्वच्छता आणि टापटीप

स्वच्छ स्वयंपाकघर, नीटनेटकी आसन व्यवस्था, शिस्तबद्व स्टाफ आणि तत्पर सेवा

कॉर्पोरेट बुकींग

१० - २०० लोकांच्या ग्रुपसाठी सर्व प्रकारच्या ब्राह्मणी पद्धतीचे घरगुती जेवण (पार्सल सेवा उपलब्ध)

Testimonials

आमच्या बद्दल आमचे ग्राहक काय म्हणतात

Best UNLIMITED thali with Brahmani taste. Its neither too spicy nor too sweet nor bland. Must recommend to all visiting Akkalkot.Also,its very close to Shri Swami samartha Vatavruksha Devasthan. Hardly 5 mins walking distance).

Chaitali

Homely Maharashtrian food. They provided साधं वरण भात for our kids, which is not part of menu. We were happy our kids enjoyed food as if they are at home. Thank you very much.

Sandeep Ranade

I was searching for good vegetarian maharastrian food option in Akkalkot and my search ended here, I would say prefect option for those who want home made good mahatrastrian thali. You might get waiting in busy days as there is limited seating arrangement, but even the waiting is worth as the food was awesome.

Prashant Patankar

After searching various options for dinner at Akkalkot.. Strange experience of hotels are open but the say they surve only during day time. Don't know what is the point keeping hotel open during night. Opposite to that Joshi Bhojanalay was the best offering home food, with various vegitables, daal, papad, raita. Sweet dish Shrikhand is also home made. Liking the taste we also purchased limbu achhar seperately. My recommendation goes with Joshi Bhojanalay. Keep up the good work.

Milind Nanal

Contact

Need Help? Contact Us

आमचा पत्ता

फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव सभागृहाजवळ, मेन रोड, अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र ४१३२१६

ई-मेल

[email protected]

संपर्क

+91 81490 10210

+91 94210 28210

वेळ

दररोज सकाळी १०:०० ते रात्री १०:००
www.000webhost.com