About Us
आमच्याबद्दल आणखी जाणून घ्या
कोणत्याही देवस्थानाचे जेवण , मग ते प्रसादालय असो वा खानावळ , अगदी मोजकेच पदार्थ घरगुती आणि संपूर्ण सात्विक जेवण, अतिउत्तम चव , यथेच्छ आणि गरमागरम जेवण असले की तृप्तीची ढेकर आल्याशिवाय राहत नाही.
- श्री स्वामी समर्थांची पावन नगरी अक्कलकोट येथे शुद्ध सात्विक आणि घरगुती जेवण मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे जोशी भोजनालय.
- श्रीमती कुसुम गुंडाचार्य जोशी यांनी 1985 ला आपल्या घरातूनच याची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात चार रुपयात पोटभर जेवण मिळत असे. नंतर मिळत जाणाऱ्या लोकांच्या प्रतिसादामुळे जोशी भोजनालयाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. .
- भात, आमटी, पोळी, भाजी असे मोजके पदार्थ असताना त्यात काळानुरूप बदल होऊन चटणी, लोणचं, कोशिंबीर ताक, पापड यांचा समावेश होऊन साग्रसंगीत जेवणाची थाळी उदयास आली. थाळी करता लागणारे सगळे जिन्नस घरच्या घरीच तयार केले जात असल्यामुळे आलेल्या ग्राहकाला घरच्या जेवणाचे समाधान मिळते. आजही आमच्याकडे एकदा जेऊन गेलेला ग्राहक अक्कलकोट ला आला की नेहमी जोशी भोजनालयातच येतो.
यथेच्छ भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य भेट द्या!
आमची वैशिष्ट्ये
साधं, मनाला समाधान देणार घरगुती जेवण हे आमचे वैशिष्ट्य. जेवणाकरता लागणारे मसाले आम्ही घरीच बनवतो.त्यामुळे आमची चव आजही टिकून आहे. जेवणाच्या थाळीमध्ये भात, दोन भाज्या, चपाती, आमटी, चटणी, लोणचे, कोशिंबीर, पापड आणि ताक हे पदार्थ असतात.
शुद्ध आणि सात्त्विक सामग्री
कृत्रिम पदार्थ किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्जपासून मुक्त, कमी तिखट-कमी तेलकट आणि पचायला हलकं जेवण
स्वच्छता आणि टापटीप
स्वच्छ स्वयंपाकघर, नीटनेटकी आसन व्यवस्था, शिस्तबद्व स्टाफ आणि तत्पर सेवा
कॉर्पोरेट बुकींग
१० - २०० लोकांच्या ग्रुपसाठी सर्व प्रकारच्या ब्राह्मणी पद्धतीचे घरगुती जेवण (पार्सल सेवा उपलब्ध)
Testimonials
आमच्या बद्दल आमचे ग्राहक काय म्हणतात
gallery
Check Our Gallery
Contact
Need Help? Contact Us
आमचा पत्ता
फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव सभागृहाजवळ, मेन रोड, अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र ४१३२१६